बुलडाणा (ब्रेकींग महाराष्ट्र) आपली छोटीशी मदत एका मुलीचे प्राण वाचवू शकते. नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील रहिवासी रविंद्र जाधव यांची १३ वर्षीय मुलगी कु.तेजस्वीनी जाधव हीच्यावर बुलडाणा येथील गुर्जर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. घरची परिस्थीती अतिशय हलाखीची व त्यातच दवाखान्याचा १ लाख रुपयांपर्यंत खर्च जाधव कुटुंबीयांना झेपविणारा नाही.
कु.तेजस्वीनीच्या मेंदूमध्ये ताप गेल्यामुळे तिला गुर्जर हॉस्पीटल बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तेजस्वीनी ही तळणी येथील पत्रकार गणेश वाघ यांची भाची आहे व टाकरखेड येथील रविंद्र जाधव यांची मुलगी आहे. दररोज तिला उपचारासाठी २ हजार रुपये खर्च व मेडीकल वेगळे, हा खर्च जाधव कुटुंबीयांना झेपविणारा नाही. सदर मुलीला १२ दिवस हॉस्पीटलमध्ये भरती राहावे लागणार आहे. रविंद्र जाधव यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्या मानाने खर्चाचा बोजा जास्त आहे. जाधव यांच्याकडे २ एकर शेती आहे, त्यावरच ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह मुला-मुलीचे शिक्षण व वृध्द आईचा औषधीचा खर्च त्यातच तेजस्वीनीवर जवळपास १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च जाधव कुटुंबीयांना झेपविणारा नसल्याने समाजातिल दानशूर व्यक्ती, समाजसेवक, राजकीय व लोकप्रतिनीधींनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून १००, २००, ५००, १००० रुपयांची मदत केल्यास कु.तेजस्वीनी जाधव हीचे प्राण वाचवू शकते. आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन टाकरखेड येथील जाधव कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या स्वईच्छेने मदत तेजस्वीनीचे मामा पत्रकार गणेश वाघ, तळणी ता.मोताळा यांचा फोनपे क्रमांक ७०२८२४८९७० वर करावी, ही अपेक्षा!