बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – एका अल्पवयीन मुलीला डांबून तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, यामध्ये पीडितेच्या मैत्रीणीसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या धक्कादायक घटनेबाबत पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या सूचनेवरून शहर पोलीस व वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने तपासचक्रे फिरवित तिघा आरोपींना जेरबंद केले. हशिर (अपूर्ण नाव, रा. बुलढाणा ) पूजा जाधव (रा. चिखली) व दीपक गवई (रा. विजयनगर बुलढाणा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३४४, ३२३, ५०६, ३४ भारतीय दंडविधानासह कलम ४, ५ (एल), ६, ८,१२ बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२, तसेच कलम ३(१) (डब्ल्यू), ३(१)(आर), ३(२) (व्हीए) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.