Chikhali

रिपब्लिकन सेना नगरपालिका स्वबळावर लढवणार : भाई विजयकांत गवई

मेरा बु., ताा. चिखली (ब्रेंकिंग महाराष्ट्र) – चिखली येथील विश्रामगृहामध्ये रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक पार पडली. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष सागर डबराचे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी नगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आम्ही स्वबळावर लढू, असे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई या बैठकीत जाहीर केले.

गवई म्हणाले की, आतापर्यंत गोरगरिबांना फक्त मतदान पुरते वापरले जात आहे, त्यांना खोटे आश्वासन देऊन नगरसेवकांनी त्यांना फक्त आश्वासनच दिले आहे. गोरगरिबांना कोणत्या योजना त्यांच्या घरापर्यंत घेऊन आले नाही मत मागण्यासाठी त्यांच्या पाया पडतात, पण त्यांना कोणत्या प्रकारची सुविधा देत नाही. निवडून आल्यावर उलट त्यांच्यावर अरेरावी करतात की मला एकच काम आहे का मी फक्त तुमच्यामुळे निवडून आलो नाही, मी एकटाच नगरसेवक आहे का, वार्डात दुसरा पण नगरसेवक आहे त्याच्याकडे पण जात जा, असे बोलून गोरगरिबांचे फसवणूक करतात. अशा नगरसेवकांना धडा शिकवण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगर पालिका स्वबळावर लढवणार व प्रत्येक वार्डात उमेदवार म्हणून उभे राहतील व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या वार्डामध्ये जोमात काम करावे, असे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी सांगितले.

या बैठकीदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी ब्रह्मभाऊ साळवे, सलीमभाई यांनी आपले मत माडले. आपल्या बहुजन समाजाला रिपब्लिकन सेनेशिवाय पर्याय नाही. या बैठकीला तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.  या आढावा बैठकीमध्ये उपस्थित चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने,  चिखली शहराध्यक्ष सुनील सोळंके,  युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे,  सतीश पवार, अन्सार भाई, रमेश अंभोरे,  राहुल साळवे,  सतीश इंगळे, वसीम भाई,  दीपक तायडे,  जावेद भाई,  विकी निकाळजे,  नरेंद्र अंभोरे,  सौरभ बावस्कर,  विशाल काकफळे रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!