लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय शेती व शेतकरी आज धोक्यात व अडचणीत आहे. कृषीप्रधान भारत देशात आज गोसंवर्धन होत नसल्याने अनेक मानवी, पर्यावरणीय, सामाजिक व शारीरिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्यांचे निवारण करायचे असेल तर गोसंवर्धन, गोवंशाचे जतन होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात गोसंवर्धन मंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी उदगीर गोपालकांच्यावतीने राज्य सरकारकडे उदगीर तहसीलदारांमार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद आहे, की देशाला १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. देशात विविध आजारांनी थैमान घातले आहे यात कॅन्सर, बीपी, मधुमेह, अस्थिरोग, रक्त विकार, अशा अनेक प्रकारचे आजार वाढत जात आहेत. मागील दोन वर्षाच्या काळात कोरोनाजन्य महामारी आजारातून आपण बाहेर पडत आहोत. मानवी रोग प्रतिकारशक्तीविषयी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. देशाचा अन्नदाता शेतकरी बांधवांकडे आपण पहातो, शेतकरी आपल्या शेतीमध्ये अंतरमशागत करून उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण खर्च वाढत असल्याने उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे आर्थिक अडचणीत ते सापडत आहेत, व यांचे रूपांतर आत्महत्यांमध्ये रूपांतर आहे. कृषीप्रधान भारत देशाची गेली हजारो वर्ष शेतीचिकित्सा व पर्यावरण यांचे समतोलन राखण्याचे रसायन हे भारतीय वंशातील देशी गोवंशात आहे.
गाय हे भारतीय अर्थव्यवस्थेची व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंब आर्थिक समृद्धी करण्यासाठी तसेच ग्रामीण अर्थक्रांती घडून आणण्यासाठी देशी गाय संवर्धन करणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात त्वरित गोसंवर्धन मंडळाची स्थापना करून त्यांची अंमलबजावणी करावी व गाय आधारित राष्ट्रीय विकास विषयाला सहकार्य करावे, अशी मागणी उदगीर गोपालक यांच्यावतीने उदगीर तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यामार्फत राज्य सरकारकडे निवेदन सादर करून करण्यात आली आहे. या निवेदनात एकूण २६ विविध प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत. यावेळी उपस्थित डॉ.रामप्रसाद लखोटीया अध्यक्ष गोरक्षण, उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर, प्रदीप बेद्रे, महादेव नवबदे, सुबोध अंबेसंगे, अजय दंडवते, सतीश पाटील, शांतवीर मुळे,त् ाानाजी हजारे, रामदास जळकोट, प्रशांत मागळूकर संघर्ष मित्रमंडळ, ‘ब्रेकिंग महाराष्ट’्रचे मराठवाडा संपादक गणेश मुंडे, विश्वनाथ बिरादार, जिव्हाळा ग्रुप प्रा.रमाकांत महेश्वर, जेष्ठ नागरिक संघ मोतीलाल डोईजोडे, राम मोतीपवले, प्रवीण जाहुरे मराठवाडा विकास परिषद, देवीदास नादरगे, दिपक बलसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.