कर्जत (प्रतिनिधी ) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कर्जत येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्याहस्ते यावेळी ध्वज फडकविण्यात आला, तर पोलिसांनी त्यांना सलामी दिली. यावेळी अनेक मान्यवर, माजी सैनिक, एनसीसीचे कॅडेट, होमगार्ड, विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उपस्थित आ. रोहित पवार यांच्या हस्ते माजी सैनिकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर कर्जत शहर व परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले, यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या कलागुणांनी देशभक्तीपर गीतांद्वारे उपस्थित यांची मने जिंकली. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते. शिक्षणच्या विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड यांनी विविध शाळांशी समन्वय ठेवत साांस्कृतीक कार्यक्रम सर्वांसमोर सादर केले. या सर्व शाळांना शेवटी प्रमाणपत्राची वाटप करण्यात आले.