– गावोगावी पाणी, शेतं उद्ध्वस्त; शेतकर्यांचा आक्रोश उसळला!
– रूम्हणा येथे जीव धोक्यात घालून वाचविला पुरात वाहून जाणारा शेतकरी!
– तालुक्यातील नदीकाठची गावे पुराच्या विळख्यात, वेशीपर्यंत पाणी आले!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यात सोमवारी (दि.२२) सकाळी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने थैमान घातले. नदीकाठच्या आणि खालच्या भागातील गावे अक्षरशः जलमय झाली. घरं, शिवार, रस्ते, वाहतूक सर्व काही विस्कळीत होऊन हाहाकार उडालेला आहे. विशेषतः तालुक्यातील सोयंदेव, खैरखेड, रुम्हणा, सोनोषी, वर्दडी, गारखेड, सुलजगाव, साठेगाव निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, किनगावराजा, चिंचोली जहाँगीर, लिंगा, देवखेड,या गावांत पाण्याने हाहाकार माजवला. अनेक घरं जलमय झाली, शेतजमिनींना तलावाचं स्वरूप आलं, उभ्या पिकांचा चुराडा झाला. गावोगावी वाहतूक ठप्प झाली असून, ग्रामस्थ मोठ्या नैसर्गिक संकटात सापडले आहेत.
अनेक गावाच्या वेशीपर्यंत पाणी शिरल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, रूम्हणा गावात पांडुरंग चाटे या शेतकर्याला पुरातून बाहेर काढण्यासाठी शिक्षक शिवहरी जायभाये व भारत शिंगारे यांनी दाखवलेले धाडस ग्रामस्थांच्या दिलासा ठरले. अनेक तरुणांनी जीव धोक्यात घालून वृद्ध व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी पोचवले. दरवर्षी या भागात पूरस्थितीची पुनरावृत्ती होत असून, ग्रामस्थांचा आक्रोश उसळला आहे. ‘आपत्ती आली की दौरे व फोटोसेशन, पण आपत्ती गेल्यावर उपाययोजनांचा पत्ता लागत नाही. आमच्या जीवाशी खेळ थांबवा, कायमस्वरूपी उपाय करा,’ अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कायंदे यांनी केली.

भरून वाहत आहेत. परिस्थिती गंभीर असून, शेतकर्यांचा घास हिरावला गेला आहे. शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थांचा संताप अनावर होईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक कायंदे यांनी दिला आहे.