-समृद्धी नरवडे, सोहम कुसमडे व ज्ञानेश्वर पितळे यांची उल्लेखनीय कामगिरी; शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषद शिक्षण विभागाच्या शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांनी सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी नरवडे हिने २६० गुण, सोहम कुसमडे याने २२६ गुण, तर ज्ञानेश्वर पितळे याने २१८ गुण मिळवले. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शिष्यवृत्ती परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक महेश नेहरे व जयश्री नेहरे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक संतोष मरभळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील, शिक्षण सभापती खुशी बोरुंदिया, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, प्रशासन अधिकारी सोनाली झिंजुडे, मुख्याध्यापक संतोष मरभाळ, सर्व शिक्षकवृंद, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीनेही प्रशालेच्या यशाचे कौतुक करून अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील व कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.