-‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत; विद्यार्थी, युवा व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
लोणार (वाजिद खान) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोणार शहरात भव्य १०० मीटर तिरंगा रॅली काढण्यात आली.
कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने, कै. कमलाबाई क. बनमेरू महिला महाविद्यालय, भारतीय जनता पार्टी लोणार व सर्व पदाधिकारी तसेच लोणार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीला लोणारचे तहसीलदार भूषण पाटील तसेच शुभम बनमेरू यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू यांच्यासह भारतीय जनता पार्टी लोणारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सामाजिक कार्यकर्ते शुभम भगत, शुभम देसाई, विनोद थोरवे, गुलाबभाई सरदार, राजेंद्र डोके, संदीप मापारी, पंढरी मापारी, अजीम चौधरी, सुधीर ठाकूर, रवी वाळसरे, पृथ्वीराज वाळसरे, स्वप्निल मापारी, आकाश जाधव, वैभव इंगोले, बल्लू मोरे, प्रेम चिपडे, निखिल मुलंगे, पंकज राऊत, सचिन जाधव, अविनाश मोरे व प्रणव वराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच युवा, भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ अशा घोषणांनी लोणार शहर दुमदुमून गेले. १०० मीटर लांबीच्या विशाल तिरंग्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले. या भव्य उपक्रमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.