-श्री संत सावता माळी सेवा मंडळाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रम; कीर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता
आळंदी (अर्जुन मेदानकर) : येथील श्री संत सावता माळी सेवा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे आळंदी देवाची येथे संत सावता माळी महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा हरिनाम गजरात, विविध उपक्रमांनी धार्मिक, मंगलमय व उत्साही वातावरणात साजरा झाला. यानिमित्त हभप शुभम महाराज पोकळे यांची संत सावता माळी महाराज यांच्या जीवनावर आधारित कीर्तन सेवा श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सुश्राव्य वाणीतून झाली. महाप्रसादाचे आयोजन राधाकृष्ण मंगल कार्यालयात करण्यात आले. येथे श्रींच्या प्रतिमेचे पूजन उत्साहात करण्यात आले.
यावेळी सर्व पदाधिकारी, समाजबांधव व भगिनींच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला. या प्रसंगी महेश गोरे, महेश जाधव, राजेंद्र गोरे, माऊली जाधव, माऊली कोद्रे, मारुती जाधव, किरणशेठ नरके, भरत गोरे, समीर गोरे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, हमीद शेख आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची हरिनाम गजरात सांगता झाली.