-रमेश पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; गुरुवारी रक्षा विसर्जन
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील बंजारा समाजातील कर्ता पुरुष तसेच भजनातील उत्तम ‘जीलकरी’ म्हणून परिचित असलेले रमेश गंगाराम पवार यांचे आज, ३१ मे रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी, ४ जून रोजी सकाळी रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.
तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील ग्रामपंचायत सदस्या श्रीमती फुलाबाई रमेश पवार यांचे पती रमेश गंगाराम पवार (वय ५८) यांचे अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान आज, ३१ मे रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्वर्गीय रमेश पवार हे बंजारा भजनातील उत्तम ‘जीलकरी’ म्हणून सर्वत्र परिचित होते. बंजारा समाजातील कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे रक्षा विसर्जन ४ जून रोजी गुरुवारी सकाळी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, मुली, नातू व बराच मोठा आप्तपरिवार आहे.