KOLHAPUR

गोवा बनावटीची सहा लाखाची दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – गडहिंग्लज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात टिक्केवाडी ता. भुदरगड येथील संशयित सुनिल यशवंत देसाई (रा. टिक्केवाडी ता. भुदरगड जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आहे आहे. याच्याकडून गोवा बनावटीची सहा लाख सहा हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. टिक्केवाडी येथे गोवा बनावटीची दारू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज शाखेला मिळाली. या माहितीनुसार, पथकाने टिक्केवाडीत छापा टाकला असता, गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी संशयित आरोपी सुनील देसाई यास अटक करण्यात आली.

संशयित देसाई हा त्याच्या चारचाकी वाहनातून गोवामधून मद्याचा साठा आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत मद्यासह एकूण ६ लाख ६ हजार ६३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधीक्षक रविंद्र आवळे यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात अवैद्य मद्य विक्रीबाबत छापे मारी सुरु आहे. त्या अनुषंगाने ही कारवाई केली. या कारवाईत निरीक्षक एम. एस. गरुड, उपनिरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक एल. एन. पाटील, सहायक निरीक्षक एस. आर. ठोंबरे, जवान बी. ए. सावंत, जी. एस. जाधव, एस. बी. चौगुले, ए. टी. थोरात यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास किरण पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!