-लोणार येथे कार्यक्रम; काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
लोणार (वाजिद खान) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी लोणार येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या आयोजनातून झालेल्या या कार्यक्रमात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सत्य, अहिंसा, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलीया, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस साहेबराव पाटोळे, गटनेते नितीन शिंदे, अनिकेत मापारी आणि आरोग्य सभापती अब्दुल उबेद अब्दुल हाजी मुनाफ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोणार नगरपालिकेचे जमील कुरेशी, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, प्रा. विठ्ठल भानुसे सर, शेख अफसर शेख तुराब, शुभम चाटे, भवानी मापारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा समाजजीवनात अंगीकार करून सत्य, अहिंसा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेची मूल्ये पुढे नेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.