-‘स्वच्छ लोणार, सुंदर लोणार’चा संदेश; नगर परिषद पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लोणार (वाजिद खान) : स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७, माझी वसुंधरा अभियान ७.० आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लोणार नगर परिषद कार्यालय परिसरात स्वच्छता श्रमदान व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
नगराध्यक्ष सौ. मीरा भूषण मापारी व गटनेत्या सौ. सीमा नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिसराची स्वच्छता करून विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छ लोणार, सुंदर लोणार’ तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. संध्या शाम राऊत, महिला व बालकल्याण सभापती सौ. वर्षा संतोष मापारी, सौ. सुप्रिया गजानन मापारी, नियोजन सभापती साहेबराव पवार, शिवसेना गटनेते मयूर गोलेच्छा, नगरसेवक इंगळे, नगरसेवक पती जमील कुरेशी, माजी नगरसेवक संतोष मापारी यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.