-राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणार शहर कार्यकारिणीला जिल्हाध्यक्षांची मंजुरी; सर्व समाजघटकांना सोबत घेऊन संघटन बळकट करण्याचा संकल्प
लोणार (वाजिद खान) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोणार शहराध्यक्ष तौफिक हाजी अब्दुल लतीफ कुरेशी यांनी लोणार शहरातील विविध समाजघटकांना कार्यकारिणीत योग्य प्रतिनिधित्व देऊन सर्व समाजांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाची शहर कार्यकारिणी सर्वसमावेशक आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्याकडून कार्यकारिणीच्या रीतसर परवानगीसह मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी तालुकाध्यक्ष अंबादास खंड पाटील, नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, पंचायत समिती लोणारचे माजी सभापती भगवान सानप, संजय अंभोरे, अभिजीत सानप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे तौफिक हाजी अब्दुल लतीफ कुरेशी यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व समाजांचा सहभाग आणि प्रतिनिधित्व असलेली कार्यकारिणी हीच पक्षाच्या आगामी वाटचालीची ताकद ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोणार शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची यादी
उपाध्यक्ष : समाधान लिंबाजी मापारी (पाटील), किरण पद्मचंद बोरा, रवी रामभाऊ खोट, भारत हरिश्चंद्र राठोड, कैलास मारोती जगदाळे.
सरचिटणीस : रऊफ खान नूर खान, संदीप सुखदेव दांडगे, परमेश्वर प्रकाश सुरजुसे, शिवाजी राजाराम चोपडे, संजू शंकर धनेकर.
सचिव : संजय वामन अंभोरे.
सहसचिव : सचिन दिलीप बाजड.
कोषाध्यक्ष : शेख रशीद शेख हमजा कुरेशी.
सदस्य : चंदू कन्हैयालाल सोनीग्रा, साजिद रहमान अली काझी, मोहसीन खान लतीफ खान, सुनील देवीदास नेवरे, शेख रशीद शेख बुढन कुरेशी, सचिन कचरू सुरजुसे, शेख असमत शेख अमीर कुरेशी, रहमत नूरा परसुवाले, मुज्जम्मील शेख बिबन कुरेशी, दीपक मारोती मोरे, मकसूद गुलाम कुरेशी, प्रकाश नारायण जाधव.