-‘सेवा आणि समर्पण’ अभियानांतर्गत ५६ हून अधिक युवकांचे रक्तदान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
लोणार (प्रतिनिधी – वाजिद खान) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त तसेच लोणार भाजप शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या ‘सेवा आणि समर्पण’ अभियानांतर्गत लोणार शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीत सहभागी होत संतांचे दर्शन घेऊन राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनानुसार लोणारमध्ये कोणतीही अनावश्यक होर्डिंगबाजी न करता सामाजिक जबाबदारी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. nकार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना आणि महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष गजानन मापारी आणि शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्या नेतृत्वाखाली ५६ हून अधिक युवक व कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. संकलित रक्त गरजू रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शुभम बनमेरू म्हणाले, “बॅनरबाजीवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गरजू रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देणे हीच खरी समाजसेवा आहे. या माध्यमातून आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.” या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, जिल्हा महामंत्री प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे, विजय मापारी, सारंग माळेकर, मेहकर तालुकाध्यक्ष आकाश सास्ते, विनोद थोरवे, युवा मोर्चा महामंत्री शुभम देसाई, शुभम भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष देवांग संचेती, किसान मोर्चा महामंत्री मारोतराव सुरोशे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक गणेश तांगडे तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, युवा मोर्च्याचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि लोणार शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.