-महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेलेली १९ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता; चिखली पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद
चिखली (अंकुश पाटील) : चिखली तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालयात बी.एस्सी.चे शिक्षण घेत आहे. २४ जून रोजी सकाळी तिचे वडील तिला परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात सोडून आले होते. पेपर संपल्यानंतर तिला घरी घेण्यासाठी ते पुन्हा महाविद्यालयात गेले. मात्र, विद्यार्थिनी महाविद्यालय परिसरात आढळून आली नाही. त्यानंतर तिचा महाविद्यालय परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, ती कुठेही आढळून न आल्याने अखेर चिखली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन काकडे करीत आहेत.