-पदग्रहण व नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला
आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निवारण समितीच्या खेड तालुका अध्यक्षपदी शंकरराव वर्पे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्षपदी कैलासराव घेनंद पाटील यांची निवड करण्यात आली. यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांना पदग्रहण सोहळ्यात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
हा पदग्रहण व नियुक्तीपत्र वितरण सोहळा माजी न्यायाधीश भूषण गवई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आळंदी येथील सुयश सभागृहात उत्साहात पार पडला. अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निवारण समिती कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या नियुक्त्या उपाध्यक्ष विकास डोळस, उपाध्यक्ष जनार्दन इंगळे, पुणे शहर कार्याध्यक्ष गिरीश घोगरे, पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने अण्णाराजे शिवले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. सुयश मंगल कार्यालयात पदग्रहण व नियुक्तीपत्र वितरण समारंभ उत्साहात झाला. यावेळी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. या प्रसंगी माजी सभापती रामदास ठाकूर पाटील, उपसरपंच दत्तात्रय वर्पे, सुनील वर्पे, चेअरमन नारायण वर्पे, खेड पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम वहिले, राजाराम लोखंडे, पांडाशेठ गावडे पाटील, रमेश गोडसे, भगवान लोखंडे, विलास काकडे, विजय ठाकूर पाटील तसेच पुणे शहरातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या अंतर्गत खेड तालुका अध्यक्षपदी शंकरराव वर्पे पाटील, उपाध्यक्ष कैलासराव घेनंद पाटील, पुरंदर तालुका अध्यक्ष दादासाहेब खटाटे, दौंड तालुका अध्यक्ष रोहित भोसले, शिरूर तालुका अध्यक्ष हरिचंद्र खैरे, उपाध्यक्ष शिवाजीराव खैरे पाटील, हवेली तालुका अध्यक्ष गणेश वागस्कर, उपाध्यक्ष प्रकाश कोतवाल तसेच आळंदी शहराध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.