-तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता तालुका क्रीडा संकुल, मेहकर येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मेहकरचे गटविकास अधिकारी डी. बी. खरात होते. प्रमुख उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत सहाय्यक गटविकास अधिकारी डि.एम.जाधव, कृषी विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे , प्रभारी गटशिक्षणाधिकारी एम.एस.वानखेडे, प्रमोद दादा रायमुलकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शिक्षक, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, संघभावना आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात विविध क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून कर्मचारी वर्गातील सुप्त कला-गुणांना वाव मिळत असल्याचे मान्यवरांनी व्यक्त केले. सर्व कार्यक्रम सुयोग्य पद्धतीने पार पडले.