-साखरखेर्डा येथे श्रद्धेने कार्यक्रम; महाआरती व महाप्रसाद
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील संताजी महाराज जगनाडे नगरातील श्री शिवाजी व्यायाम शाळेत संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी श्रद्धेने साजरी करण्यात आली.
यावेळी समाजबांधवांनी संताजी महाराज यांच्या प्रतिमेस महाआरती व पूजन करून अभिवादन केले. संत संताजी महाराज जगनाडे हे ज्ञानाचा अथांग सागर असून मराठी साहित्य क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक अभिमन्यू इंगळे यांनी केले.
संताजी महाराज यांनी लिहिलेल्या संत तुकाराम महाराजांच्या गाथेमुळे संत तुकाराम महाराजांचे विचार आणि त्यांनी बहुजन समाजाला दिलेला संदेश आजही आपल्याला समजतो. संतांचे अभंग व ओव्या अजरामर असून त्यांच्या विचारांच्या मार्गाने चालणे हीच खरी पुण्यतिथी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी सरपंच महेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रसिद्धी प्रमुख अशोक इंगळे, श्रीराम सराफ, जगदीश इंगळे, लखन सोनुने, सोमेश इंगळे, गजानन इंगळे, रमेश सराफ, नरेंद्र पाटील, भास्कर बेंदाडे, शेखर पाटील, सचिन पाटील, शिवदास इंगळे, रामा सोनुने, बंडू सोनुने, शुभम वडणकर, गणेश शिरसागर, चिन्मय बेंदाडे, गणेश सोनुने, धनंजय खरात, पवन पोधाडे यांच्यासह समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन गजानन इंगळे यांनी केले. यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.