Breaking newsBuldanaBULDHANAHead linesKhamgaonVidharbha

पोटाला दोन चिमुकले बांधलेले तरूणीचा मृतदेह आढळल्याने खामगाव तालुक्यात खळबळ!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील पिंपळी गवळी गावातील पाझर तलावात एका तरूण विवाहितेने तिच्या पोटाला बांधलेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आत्महत्या आहे, की हत्या, याबाबतचा उलगडा करण्याचे आव्हान खामगाव पोलिसांसमोर निर्माण झालेले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तीनही मृतदेहांचा पंचनामा करुन ते ताब्यात घेतले.

सविस्तर असे, की पतीपासून विभक्त राहत असलेली पार्वती प्रकाश इंगळे (वय ३०), आर्यन प्रकाश इंगळे (वय ८) आणि प्राची प्रकाश इंगळे (वय ५) अशी या तिघांची नावे आहेत. या महिलेच्या कंबरेला दोन्ही मुले बांधलेले होते. पार्वती इंगळे या काही दिवसांपासून पतीपासून विभक्त राहात होत्या, तसेच त्यांना कौटुंबीक त्रासही होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी मुलांसह आत्महत्या केली, की त्यांची हत्या झाला, याचा तपास करण्याचे खामगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे तीनही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वीची असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या तलावातून गावकर्‍यांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा गावकर्‍यांनी तलावापाशी जाऊन पाहिले असता, पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही माहिती गावात पसरताच अनेक लोक तलावापाशी जमले होते. त्यानंतर खामगाव पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जागेवरच पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले होते. विशेष बाब म्हणजे, मागील आठवड्यात याच तलावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. सध्या पोलिसांच्या मते ही आत्महत्याच असल्याचा दिसत असले तरी तरीही वेगवेगळ्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!