BULDHANAVidharbha

सरपंचांसह बिनविरोध होणारी वाघाळा ठरली सिंदखेडराजा तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत!

– ग्रामपंचायतीवर आले महिलाराज, सरपंचांसह बहुसंख्य जागांवर महिला!

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा ग्रामपंचायतदेखील सरपंच, उपसरपंच सदस्यांसह बिनविरोध झाली आहे. सौ. रंजना विष्णू काकड यांची सरपंच म्हणून वाघाळा ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली तर सखाराम साहेबराव माळेकर उपसरपंच, श्रीकृष्ण श्रीपत बनसोडे, सौ. वदना विष्णू पांगरकर, सौ. ज्योती सखाराम राठोड, सौ. छाया चंद्रहार चव्हाण, सौ. आनंदाबाई वसंत जायभाय, प्रमोद दगडू खर्डेकर, अंकुश नारायण राठोड, सौ. सविता सुभाष निबेकर यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्ताने वाघाळा ही सिंदखेडराजा तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, ग्रामपंचायतीवर महिलाराज अस्तित्वात आले आहे.

वाघाळा गावातील सर्व लोकांनी एकमतांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची एकमताने निवड केली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे संपूर्ण तहसीलमध्ये अर्ज भरणारे लोकांची भरपूर गर्दी होती. परंतु वाघाळा येथे जे लोकांनी एकमतांनी उमेदवार दिले होते, त्यांच्याविरोधात कोणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे वागाळा गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या विरोधात अर्ज नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सिंदखेडराजा तहसीलचे चेके व घुसंगे यांनी या प्रक्रियेमध्ये शासकीय भूमिका निभावली. सरपंच, उपसरपंच यांच्या निवडीमुळे वाघाळा गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व गावात फटाके फोडून फटाक्याच्या आतषबाजी करून गावामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे जंगी मिरवणूक काढून गावातून गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे.

यापूर्वी तीस वर्षाच्या अगोदरसुद्धा वाघाळा गावाने सर्व जिल्ह्यासाठी एक आदर्श ठेवला होता. याआधी वाघाळा गावची एक निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर तीस वर्षांनी परत एकदा वाघाळा गावच्या लोकांनी एक आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. या गावची स्वातंत्र्यापासून ही दुसरी निवडणूक झाली असून, आज ग्रामपंचायत म्हटले, की घराघरात राजकारण दिसते. परंतु वाघाळा गावाच्या लोकांनी एक आदर्श संपूर्ण जिल्ह्यासमोर ठेवला आहे, आणि ग्रामपंचायतीवर महिलांचे राज्य आले आहे. आज समाजामध्ये महिला म्हटले की चूल आणि मूल दिसते. परंतु वाघाळा गावाचे सरपंच या उच्चशिक्षित असून, त्यांनी त्यांचे समाजामध्ये व इतर समाजामध्येसुद्धा सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना गावांमध्ये कोणीही विरोध केला नाही, तसेच त्या सार्वजनिक कामांमध्ये अग्रेसर असतात, त्याची पावती त्यांना आज सरपंच म्हणून निवड करून लोकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!