BULDHANAChikhaliVidharbha

चिखली येथे रविवारी सकल मराठा समाजाचा वधु-वर, पालक परिचय मेळावा

– मॉ जिजाऊ वधु-वर सूचक केंद्राचा उपक्रम

चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली येथे रविवारी (दि.४) सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाचा वधु-वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला खान्देश, मुंबई, पुणे, सोलापूर, बीड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नांदेड, परभणी येथून सुमारे ७००पेक्षा जास्त वधू-वर व त्यांचे पालक येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शहरातील जैस्वाल मंगल कार्यालय खामगावरोड चिखली, येथे हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष वैभव भाऊराव पाटील पवार तसेच डॉक्टर गणेश देशमुख, शिवाजीराव काटे, गिताराम तायडे, अमित जाधव, ईश्वर वाघ, प्रमोद पाटील, संजय पांचाळ, प्रवीण ठोसरे, अनिल तुपकर, सुनील रिंढे, सतीश गावंडे, वकील राजेंद्र ठोसरे, नारायण देशमुख, गणेश भोसले, अरुण देशमुख, गजानन माळेकर यांनी मॉ जिजाऊ वधु-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन केले असून, काटेकोरपणे नियोजन सुरु आहे. वैभव भाऊराव पाटील पवार यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वदूर संपर्क दौरादेखील केला आहे. त्यासाठी पाहणी परिचयातून मेळाव्यातच ३० ते ४० विवाह मार्गी कसे लागतील, यासाठीसुध्दा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे.

या शिवाय, या मेळाव्यात वधु व वरांची नाव नोंदणी, परिचय होणार असून, मराठा समाजाला लागलेला शाप जसे हुंडा, कुंडली मिलन, गुण पाहणे, मंगळ वैगरे मानणे याबाबत मान्यवर समाजाला प्रबोधन करणार आहेत. पालकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी हजारो स्थळे पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नावे नोंदविण्यासाठी वधु-वर व पालक मेळावा समितीमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य हे प्रयत्न करत आहेत. वधू-वर व पालक यांनी जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीतर्पेâ करण्यात आले आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!