– मिसाळवाडीच्या प्रीती गजानन झाल्टे हिनेदेखील मिळवले नेत्रदीपक यश
चिखली (विशेष प्रतिनिधी) – देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालयाच्या मुलींनी जिल्हास्तरीय मैदानीत स्पर्धेत घवघवीत यश मिळवून विभागीय स्पर्धेसाठी कुमारी कोमल लिंबाजी वरपे ही विद्यार्थिनी पात्र ठरली आहे. या मुलीचे सर्वस्तरातून, तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबेंसह मुख्याध्यापक व शिक्षकवृदांनी कौतुक केले आहे.
युवक व क्रीडा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १९ वर्ष वयोगटाच्या मैदानी स्पर्धेत जानकीदेवी विद्यालयाच्या स्पर्धक कुमारी कोमल लिंबाजी वरपे हिने ३००० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळाला, व तसेच ३००० मीटरमध्ये कुमारी प्रीती गजानन झाल्टे हिने तृतीय क्रमांक मिळवला. पुढील महिन्यात होणार्या विभागीय स्पर्धेसाठी कुमारी कोमल लिंबाजी वरपे या मुलीची निवड झाली. त्याबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
——————