LONAR

आरोग्य तपासणी शिबिराचा ४०० रुग्णांनी घेतला लाभ

– मोफत रक्त व आरोग्य तपासणी, तसेच औषधीचेही झाले वाटप!

लोणार (विनोद पाटील तेजनकर) – लोणार तालुक्यातील शिवनी पिसा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्व. किसनराव लक्ष्मणराव पिसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा खेड्यापाड्यातील ४०० रुग्णांना लाभ झाला आहे.

शिवनी पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये संपन्न झालेल्या या शिबिरामध्ये आजूबाजूच्या गावातील महिला, पुरुष यांनी आपली नावनोंदणी करून उपचार घेतले. या शिबिरामध्ये एकूण ४०० पेशंटचे उपचार करण्यात आले. यामध्ये लहान बालकाचे ८०, ५० गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली, तसेच २०० पेक्षा जास्त मंडळींनी आपली तपासणी करून घेतली. शिबिरात मोफत रक्त तपासणी, मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. त्यानंतर नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीमती अनुसयाबाई किसनराव पिसे, दिलीपभाऊ वाघ (जि. प. सदस्य), डॉ. दैवशला बलशेटवार (तालुका आरोग्य अधिकारी), अशोक किसनराव पिसे, विकास पिसे (सरपंच, शिवणी पिसा), डॉ. निखिल दिलीपराव पिसे (हृदयरोग व मधुमेह तज्ञ), डॉ. प्रांजली पिसे (झनक) स्त्री रोग तज्ञ, डॉ. प्रवीण गवई (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. वैभव मापारी (जनरल फिजिशियन), डॉ. हरीश काळे (मेडिकल ऑफिसर), डॉ.सचिन देसाई (मेडिकल ऑफिसर), डॉ.कविता भिसे (मेडिकल ऑफिसर), डॉ.सचिन आडे (मेडिकल ऑफिसर), तसेच औषधी निर्माता किशोर उंबरकर, ज्योती सपकाळ मॅडम, आरोग्य सेवक खंडागळे साहेब, गणेश वाघ (रक्त संकलन ), अतुल पिसे पाटील, भिकाजी पिसे पाटील, संजाबराव पिसे पाटील, सुनिल पाटील वाघ, व समस्त गावकरी मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या गर्दीने सहभागी झाले होते.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!