– जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात घेतले लोकाभिमुख निर्णय
सर्व सामान्यांची नाळ जोडत गोरगरीब गरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावत नगरसेवक ते पाणीपुरवठा सभापती नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अगदी लहान वयात पद संभाळणारे मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ते पहिले तरुण नेतृत्व ठरले आहे. घरातून थोडा राजकीय वारसा लाभलेले पण स्वकतृत्वावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, मग तो विरोधी पक्षातील असतील किंवा पक्षातील असतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. जि.प.अध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले व लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात गाजवली. त्यातील पहिला निर्णय म्हणजे कर्मचारीवर्गातील कुणी आपल्या आई वडीलांचा सांभाळ न करता त्यांना घराचा बाहेर हकलणे, त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांची आर्थिक बाजू कमकुवत करणे असे होत असल्याचे निदर्शनास येताच लगेच ठराव घेवून कर्मचारी यांच्या खात्यातून ठरावीक रक्कम आई वडीलांच्या खात्यात जमा करण्याचे निर्णय घेतला, व तो निर्णय घराघरात पोहोचून लोकप्रिय झाला. वडीलधारी मंडळी माझा राहुल असा उद्गार काढू लागले.
या शिवाय, १) गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी २०२० मध्ये झाले. २) जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन ३) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इसरो बेंगलोर येथील वैज्ञानिक सहल जिल्हा परिषदेमार्फत आयोजित फेब्रुवारी-२०२०, ४) जिल्हा परिषद इमारतीचे नूतनीकरण तसेच दिव्यांगासाठी लिफ्टची विशेष सोय. स्वतः लिफ्टचा वापर करणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांचे उदगार ५) जिल्ह्यात ७५ हजार रेशन कार्डचे वाटप (६) जिल्हा परिषदेच्या शाळांना १७ लाखापर्यंत प्रयोग शाळा उपलब्ध करून दिल्या ७) कोरोना काळामध्ये संपूर्ण जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन कर्मचार्यांचे मनोधैर्य वाढवले ८) संपूर्ण देशभरातून दुसरी व महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वाटप आठ कोटी मे – २०२० ९) जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी दिलेल्या जीबीमधील ठराव १६ जून २०२०. १०) आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याचा ठराव घेतला जीबी दिनांक १६ जून २०२०. ११) आशा वर्कर यांना सेवेत कायम करून पगार वाढ करण्यात संबंधीचा ठराव घेतला जीबी १६-०६ २०२०. १२) जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा पुतळा बसवणे ठराव घेतला. १३) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजनेच्या पंधरा वर्षांपासून झालेल्या कपात यांचा हिशोब देणारी एकमेव आणि पहिली जिल्हा परिषद. १४) आई-वडिलांना संभाळणार्या जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचार्यांच्या खात्यामधून ठराविक रक्कम कपात करून आई-वडिलांच्या खात्यात जमा करण्याचा ठराव घेतला. १५) ११५ नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्रस्तावित करून राज्य शासनास मंजुरीसाठी पाठविले. १६) तीन वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदलीने १३६ शिक्षकांना जिल्हा परिषद मध्ये समावेश केला. १७) शिक्षण विभागातील मुख्याध्यापक प्रमोशन, विस्तार अधिकारी प्रमोशन केले.१८) परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव घेतला. १९) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा ठराव घेतला. २०) शेतकर्यांच्या बांधावर कृषी व पशुसंवर्धन विभागाची बैठक मोहन शेतकर्यांचा सन्मान वाढवला. तसेच जिल्ह्यातील ८ हजार ७९७ दिव्यांगाना केंद्रीयमंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते कृत्रिम साहित्य वाटप दिव्यांगाना साहित्य वाटप करणारी महाराष्ट्रात पहिली व देशात दुसरी जिल्हा परिषद केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय व भारत कृत्रिम अंग निर्माण (अल्मिको) यांच्या विद्यमानाने लातूर जिल्ह्यातील ८ हजार ७९७ दिव्यांगांना उपयोगी कृत्रिम साहित्याचे वाटप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांच्याहस्ते १० डिसेंबर रोजी केले, असे धडाडीचे निर्णय घेत आपला कार्यकाळ लोकाभिमुखपणे व्यवस्थित पार पाडला.
याशिवाय, इतर महत्वाच्या निर्णयांमध्ये – कोरोना काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुलभैया केंद्रे यांच्यासह उपाध्यक्ष सर्व सभापती व सदस्य यांनी आपले मानधन दिले, राहुल भैया यांच्या आवाहनानुसार, जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचार्यांनी एक दिवसाचा पगार जवळपास पावणे दोन कोटी रुपये हे जमा केला होता. कोरोना काळात शाळा बंद असताना बाला उपक्रमाच्या माध्यमातून शाळांना नवीन रूप दिले. हॅपी होम अंगणवाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्या या इंग्लिश माध्यमाच्या शाळेच्या तोडीसतोड बनवण्यात आल्या. परिषदेचे स्वतःचे ऑक्सीजन बेड युक्त कोव्हीड केअर सेंटर लातूर येथे स्थापन करून नागरिकांचे प्राण वाचवले. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ५ ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यात आले. ड्राईव्ह टू दिव्यांग योजनेअंतर्गत दिव्यांगांना कोरोना काळात त्यांच्यापर्यंत जाऊन लसीकरण करण्यात आले. समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग तथा आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मोठ्या दिमाखदार कार्यक्रमांमध्ये करण्यात आले. गरोदर मातांना बेबी केअर कीट चे वाटप पूर्ण जिल्हाभरात करण्यात आले. अशा प्रकारे धाडीचे निर्णय घेऊन राहुलभैय्या केंद्रे यांनी आपली अविट छाप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सोडली, त्यांच्या कामाचे राज्यभरातून कौतुक झाले. निस्वार्थी अध्यक्ष म्हणूनही चर्चिले जाणारे ते महाराष्ट्रातील एकमेव तरूण अध्यक्ष ठरले. अशा या लोकप्रिय राहुलभैय्या केंद्रे यांची जागा खरे तर राज्याच्या मंत्रिमंडळात हवी आहे. तसे झाले तर ते राज्याच्या हिताचे असेच धडाडीने निर्णय घेतील, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मराठवाडा विभाग सहसंपादक आहेत.संपर्क – ९६३७००००७४)