विविध प्रलंबित मागण्यासाठी आशा आणि गट प्रवर्तकांचे जिल्हा परिषदेसमोर धडक मोर्चा व आंदोलन
नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) : सातपुड्याच्या दुर्गम भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचे आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करत होते. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील जवळपास 2000 पेक्षा अधिक आशा सेविका यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे समान काम समान वेतन या सह विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन करत, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आशा कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर व्हावे तसेच त्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात यासह स्थानिक पातळीवरील समस्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली. आशा सेविकांना दिवाळी पूर्वी त्यांचे बाकी वेतन आणि कोरोना काळात केलेल्या कामाचे बाकी असलेले पैसे दिवाळी पूर्वी देण्याची मागणी करण्यात आली जिल्हास्तरावरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.