AalandiPachhim Maharashtra

कामगार, शेतकरी, व्यापारी यांच्या हिताचे नसलेले कायदे रोखा : कामगारनेते भोसले

आळंदी ( अर्जुन मेदनकर) : विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या माऊलींचे नगरीत केंद्र व राज्य सरकारच्या नवीन कामगार कायद्याचे विरोधात लढा उभारण्याच्या आंदोलनाची घोषणा करीत, राज्यव्यापी जनजागृती आंदोलन सुरु करीत आहे. विश्वासाठी माउलींनी पसायदान मागितले. माऊलींचे भूमीत श्रमिकांसाठी दान मागावे. कामगारावर भविष्यात होणारे अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी श्रमिकांत जागृती करायची आहे. गाव तिथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शाखांतून कामगार, शेतकरी, व्यापारी यांचे वर नवीन कायदयाने होणारा अन्याय दूर करण्यास लढा उभारला जात आहे. यात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कामगारनेते यशवंत भोसले यांनी केले.

आळंदी येतील साईराज मंगल कार्यालयात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे वतीने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानातून कामगारनेते भोसले यावेळी मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी शशांक इनामदार,उद्योजक सुरेश झोंबाडे, कामगार प्रतिनिधी शंकर गावडे, सतीश एरंडे, अंकुश सुतार, सुरेश निकम, बापू थोरवे, बाळू चौधरी, दशरथ वाघ, अजित लोंढे आदींसह विविध कंपन्यातील कामगार युनिटचे कामगार प्रतिनिधी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध कामगार युनिटचे प्रतिनिधी यांचेशी संवाद साधण्यात आला.

कामगारनेते भोसले म्हणाले, कामगार,व्यापारी आणि शेतकरी यांचा विकास व्हावा यासाठी गाव तिथे श्रमी आघाडीची शाखा सुरु करून आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याचे कार्यात सर्वानी साथ द्यावी. शाखा ही सेवा केंद्र व्हावीत. आपण राहू न राहू मात्र माऊली येथे कायम रहाणार आहे. माऊलीना वंदन करून श्रमिकांना न्याय मिळू दे असे साकडे माउलींना त्यांनी घालत उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रमिकांत मोठी ताकद आहे. मात्र श्रमिकांचे पुढाऱ्यानी जो गैर समाज करून घेतला आहे. तो गैसमज दूर व्हावा. नवीन कामगार कायदे कामगार हिताचे नसून उद्योजक, सरकार धार्जिणे आहे. श्रमिकांच्या प्रतिनिधींनी, कामगार संघटनांनी वेळीच डोळे उघडे ठेवून नवीन कामगार कायदयास प्रखर विरोध करण्याची गरज आहे. देशात शेतकरी,व्यापारी आणि आता कामगार यांचेवर मोठ्या प्रमाणात अन्याय सुरु आहेत. शेतमालाला भाव नाही, कामगारांना नोकरीची हमी नाही, व्यापारी, नागरिक जी.एस.टीने त्रस्त आहेत. यामुळे भविष्यात कंपन्या देखील अडचणीत येतील. आता मिळणारी कर्ज देखील भविष्यात मिळतील याची शास्वती नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्वांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. पुण्यातील कामगार आयुक्त कार्यालया बाहेरील १३ दिवसांचे उपोषण आंदोलन यात देखील कामगार हितासाठी लढा देण्यात आला. यावेळी कामगार नेते स्व.नारायण लोखंडे यांचेसह हुतात्मा, क्रांतिकारक, राष्ट्रीय पुरुष आणि संतांनी समज विकासात तसेच देशाचे स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान यांची त्यांनी आठवण करून दिली. पारतंत्र्यात कामगारांसाठी तसेच देश स्वातंत्र्या साठी अनेक जण हुतात्मा झाले.या कार्यातून प्रेरणा घेऊन कामगारांसाठी अधिक प्रभावी लढा उभारला जाईल यासाठी आपलाही साथ आणि जनजागृती करण्यासाठी गाव तिथे शाखा सुरु करून शाखा सेवा केंद्र व्हावीत असे सांगितले.

नवीन कामगार कायद्याने कामगारांची नोकरी धोक्यात येणार आहे. ठराविक वर्षाच काम त्यानंतर नोकरी पुढे राहील कि नाही याची हमी नाही. मालक तीन, पाच वर्ष येवढेच दिवस काम नंतर पुठे काय असा सवाल त्यांनी केला. उद्योजक धार्जिणे कामगार कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. चार, पाच कंपन्या सोडल्या तर इतर सर्व कामगार ३०० चे आतील कंपन्यातील असल्याने नोकरी धोक्यात कामगारांना कायम नोकरीची शास्वती नसणार असे त्यांनी सांगितले.कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. उद्योग पतींचा पगडा सरकारवर असतो. कामगार नेत्यांचा सन्मान गेटचे बाहेर मात्र मोठ्या कार मध्ये आलेल्या मालकांना सरकार रेड कार्पेट टाकले जाते आहे. कामगार नेते नआणि कोणताही राजकीय पक्ष नवीन कामगार कायद्यावर बोलत नाही. हे या देशाचे दुर्दैव आहे. शेतकरी, श्रमिक, कामगार, व्यापारी संपविला जात आहे. यात ऑनलाईन खरेदी सुरू झाली असून लहान दुकानदार अडचणीत येणार आहे. राज्य आणि देशातील उद्योगपती यामुळे श्रमिक देशोधडीला लागणार मात्र त्यानंतर उद्योजक देखील देशोधडीला लागतील असा इशारा भोसले यांनी दिला. भविष्यात नोकरी कायम नसल्याने कर्ज नाही, घर नाही, बिल्डर नाही, दुचाकी निर्मिती करणारे हे ही देखील अडचणीत येऊन कारखाने बंद पडतील. यासाठी वेळीच सर्वानी जागे होऊन कामगार विरोधी नवीन कायदे रद्द करण्याचे लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन भोसले यांनी केले. व्यापारी, श्रमिक , कामगार उद्वस्त होतोय. शेतीला हमी भाव नाही. उसाला भाव नाही. शेतकरी कर्ज माफीची वाट पाहतोय. दुधाला भाव नाही. अमृत महोत्सवी वर्षात शेतकरी आत्महत्या करतोय. ज्यांनी पिळवणूक केली त्यांचेच झेंडे आपण मिरवतो. येत्या निवडणुकांत याचा जाब विचारा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
नोक-याच राहिल्या नाहीत तर आरक्षणाचे करायचे काय असा सवाल त्यांनी केला. कामगार हिताचे कायदे संपुष्टात आणले जात आहेत याचा जाब येत्या निवडणुकीत विचारा. स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या कुठे आहेत नोकऱ्या असा सवाल त्यांनी केला. यापुढील काळात लाखोंचे संख्येने रस्त्यावर येऊन कामगार हिताचे काम न करणारी सरकारे पाडण्याचे आवाहन भोसले यांनी केले.

भाेसले म्हणाले, गाव निहाय शाखा काढा, व्यापारी संपुष्टात येत चाललंय, व्यापाऱ्यांनी व श्रमिक यांनी नवीन कायदे समजून घ्यावेत, स्वातंत्र्य जतन केले पाहिजे. हिताचे नसलेले कायदे वेळीच रोखण्याची गरज आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कामगार संघटना देखील संपुष्टात येतील. कामगार कायद्यातून येत्या पिठ्या गुलाम होतील. कामगार कायदे का रोखले नाहीत असा जाब आपली मुले भविष्यात विचारतील त्यांना काय जाब देणार असा सवाल त्यांनी विचारात मार्गदर्शन केले. संत विचारातून ही क्रांती घडणार आहे. देशाचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी कृपाशिर्वाद आणि साथ मिळावी यासाठी आळंदीतून मेळाव्यांचे माध्यमातून सुरुवात आळंदीतुन करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.  कपारो कामगार युनियनचे प्रतिनिधी गिरीश दानवे यांनी कामगार संघटनेसह कामगारांचा विकास आणि उन्नत्ती यशवंत भोसले यांच्या नेतृत्वात सर्वांची उन्नती होईल. यावेळी अण्णासाहेब दौन्डकर म्हणाले, कामगारांच्या न्याय हितासाठी सर्वानी एकजुटीने कामगारांच्या लढ्यात सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. राठी कामगार युनियन युनिटचे अंकुश सुतार म्हणाले, देशात नवीन कामगार कायदा येत असून यास कामगारांचा विरोध आहे. नवीन कायद्याने कामगाराची पिळवणूक होऊन नोकरी धोक्यात येणार आहे. यामुळे कामगारनेते यशवंतराव भोसले यांनी पुण्यात १३ दिवस प्राणांतिक उपोषण केले. हे पुण्यातील प्रभावी आंदोलन झाले. सुतार यांनी आंदोलनाचा आढावा घेत या आंदोलनास कामगारांनी देखील यशस्वी साथ दिल्याचे सांगितले. राठी युनिटचे सुरेश म्हणाले, कामगार नेते यशवंताव भोसले यांचे विचार सर्व कामगारा पर्यंत आपापले भागात कामगारांत प्रसारित करायचा आहे. कामगारांवरील अन्याय दूर करायचा आहे. यावेळे ते म्हणाले कामगारांनी जागृत होऊन दक्षता घेण्याची असल्याचे सांगितले.

उद्योजक सुरेश नाना झोंबडे म्हणाले, उद्योजकानी कोरोना काळात एमआयडीसी मधील कामगार यांना कामावरून काढून कामगाराणी रोजी रोटी काढून घेत ते बेकार करण्याचे प्रयत्न केले गेले. कामगारांचे न्याय हक्कासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेतृत्वात यशवंतराव भोसले यांनी प्राणांतिक १३ दिवस उपोषण करून लढा दिला. यामुळे कामगारांना कामावर परत घेण्यास लढा यशस्वी झाला. नवीन कामगार कायद्यात कामगारांच्या संख्येची मर्यादा आणून उद्योजकांनी त्यांचे हिताचे धोरण आणले आहे. यामुळे कामगारांच्या संख्येची मर्यादा रद्द करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समन्वयक साहेब शशांक म्हणले, कामगार मेळाव्याचे आयोजन नवीन कामगार कायद्याने येणाऱ्या संकटाची जाणीव कामगारांना करून देण्यासाठी करण्यात आले आहे. मेळाव्यातुन पंचक्रोशीतील कामगारांत जनजागृती व्हावी. तत्पूर्वी भाऊंचे प्राणांतिक उपोषणातून प्रभावी लढा देण्यात आला. कामगार क्षेत्रातील लोकांना कामगार कायद्या बाबतची जागृती करण्याचे काम सर्वानी करावे असे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी प्रचार प्रसार केल्यास जागृती होईल. नवीन कामगार कायदे रोखण्यास लावण्याची ताकद कामगारांनी आपल्या आंदोलनातून निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कामगार मेळाव्यात वीज खंडित झाली. तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस येत असताना देखील कामगारांची मोठी उपस्थिती राहिल्याने कामगार मेळावा यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!