-जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेससह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारीपदी नियुक्ती
लोणार (वाजिद खान) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या जिल्हा प्रभारीपदी, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर श्यामभाऊ उमाळकर यांचे प्रथमच लोणार येथे आगमन झाले. यावेळी निकिता पेट्रोल पंप येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश मापारी, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, बांधकाम सभापती अनिकेत मापारी, आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी मुनाफ आणि युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मोरे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्यामभाऊ उमाळकर यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यात आले, तसेच आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.