उदगीर (संगम पटवारी) – येथील देगलूर राेडवर दाेघाजणांत टेम्पो बारीला लावण्याच्या कारणावरून वाद होवून तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दगड, लोखंडी टॉमी व काठीचा वापर करण्यात आला. या हाणामारीत दोघा गटातील व्यक्ती जखमी झाले असून, उदगीर पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देगलूर रोडवर दोन गटात हाणामारीची ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देगलूर रोडवरील बालाजी टाईल्स गोडावूनच्या समोर अब्दुलगणी मैनोद्दीनसाब तांबोळी (वय 35 वर्ष) राहणार मुक्रमाबाद ता. मुखेड, जि. नांदेड व विकास शिवाजी जाधव राहणार बोरतळा तांडा या दोघात टेम्पो बारीला लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. हाणामारीत दगड, लोखंडी टॉमी व काठीचा वापर करण्यात आला. या हाणामारीत दोघा गटातील व्यक्ती जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील व्यक्तीनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी दोन्ही गटावर 9 सप्टेंबर रोजी रात्री गुरंन 414/2022कलम 327,324,323,504,34 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांच्याकडे देण्यात आला आहे.