-कुटुंबीयांकडून नागरिकांना शोधासाठी सहकार्याचे आवाहन
बिबी (ऋषी दंदाले) : बिबी, ता. लोणार येथील रहिवासी गजानन आत्माराम साळवे हे दि. २५ ऑगस्ट २०२६ पासून बेपत्ता आहेत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत असून, नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत बिबी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे आढळून आल्यास तातडीने ९५११९७४७३५ / ९१५६३००९५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.