-गरजू, निराधार व वृद्धांना मदतीचा हात; सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक
वर्धा (प्रकाश कथले) : समाजसेवेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नारायण सेवा मित्र परिवार, हिंगणघाट यांच्या वतीने डॉक्टर्स डे, सीए डे आणि शेतकरी दिनाचे औचित्य साधत जलाराम मंदिर परिसरात गरजू, निराधार आणि वृद्ध नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत करत आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अभिजीत बोरकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश खिळेकर, डॉ. कमलेश कटारिया, डॉ. शरद मद्दलवार, डॉ. रमेश निखाडे तसेच सीए श्यामकुमार करवा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नारायण सेवा मित्र परिवाराच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच खरी मानवसेवा असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर मोठ्या संख्येने गरजू बांधवांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात गरजूंना संरक्षण मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल, पुखराज रांका, रितेश पीपलवा, रूपचंद हेमनानी, विजय गुप्ता, रवि दुरशेट्टीवार, दामोदर चंदनखेडे, यशवंत गढवाल, अरुण पंडित, चंद्रकांत कामडी, पराग मुडे, दुर्गाप्रसाद यादव, प्रा. किरण वैद्य, विपिन खींवसरा, ॲड. विशाल जैन, रामदास खडगी, अमोल भूतडा, सुभाष लालवानी, सुभाष शेंडे, विजय मुथा, किरण अग्रवाल, ज्योती धार्मिक, मंगला शेंडे, नंदिनी जवादे, शुभांगी वैद्य, कंचन खींवसरा, भाग्यश्री खियानी, अलका राणपारा आणि सीमा करनावट यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सहकारी, दानशूर व्यक्ती आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. समाजोपयोगी उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा नारायण सेवा मित्र परिवाराचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.