१४ जून रोजी अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठ येथे होणार सन्मान
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांना उद्या, दि. १४ जून रोजी प्रतिष्ठेचा ‘कीर्तन सुधाकर’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
परमपूज्य श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी तसेच परमपूज्य श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या आदेशानुसार श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा दि. १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता श्री जगद्गुरु पंचाचार्यांच्या सानिध्यात, बृहमठ होटगी, अक्कलकोट रोड येथील वीरतपस्वी मठात आयोजित करण्यात आला आहे. सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांना धार्मिक, आध्यात्मिक आणि कीर्तन क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याची माहिती वाराणसी येथील जंगम मठाचे प्रबंधक आर. के. स्वामी यांनी दिली.