-राजकीय हालचाली वाढल्या; पॅनल निर्मिती व बैठकांना वेग
-वार्डनिहाय उमेदवारांसाठी करावी लागणार कसरत!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्यपदाची आरक्षण सोडत काल, दि. ११ जून रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात काढण्यात आली. सर्वांचे लक्ष लागून असलेली आरक्षण सोडत जाहीर झाल्याने आता राजकीय हालचालींना वेग येणार असून पॅनल निर्मिती व बैठका सुरू होणार आहेत. दरम्यान, काही वार्डांमध्ये उमेदवार मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा ही १३ सदस्यीय ग्रामपंचायत असून तालुक्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे, गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून थेट निधी ग्रामपंचायतीला दिला जातो. सरपंचांना असणारे अधिकार लक्षात घेता या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. देऊळगाव साखरशा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्यपदाची आरक्षण सोडत काल, दि. ११ जून रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात काढण्यात आली. त्यामध्ये पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले :
वार्ड क्रमांक १ – ३ जागा
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- सर्वसाधारण महिला
- सर्वसाधारण
वार्ड क्रमांक २ – ३ जागा
- सर्वसाधारण महिला
- सर्वसाधारण
- सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ३ – ३ जागा
- अनुसूचित जाती
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक ४ – २ जागा
- अनुसूचित जाती महिला
- सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ५ – २ जागा
- नागरिकांचा मागास प्रवर्ग
- सर्वसाधारण महिला
सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
यावेळी अध्यासी अधिकारी तथा नायब तहसीलदार विवेक नालट, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, मंडळ अधिकारी बालाजी अनमोड, महसूल सहाय्यक टाले, महसूल सहाय्यक अश्विन ठाकरे, महसूल सेवक प्रवीण कायंदे, ग्रामपंचायत अधिकारी अनंत आघाव, ग्राम महसूल अधिकारी बालाजी माने उपस्थित होते. यावेळी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून वार्डनिहाय सदस्यपदाचे आरक्षण काढण्यात आले. प्रसंगी प्रशासक संदीप अल्हाट, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद देशमुख, रणजित देशमुख, बाळू वानखेडे, अॅड. शैलेश गायकवाड, माजी सरपंच सखाराम आमले, पुंडलीक नवत्रे, रामा ढवळे, दिलीप नवत्रे, संतोष बोरचाटे, हमीदबेग मिर्झा, पत्रकार गणेश पाटील, गौरव देशमुख, शे. गुलाब, नितीन काळे, पत्रकार नवल राठोड, बी. एम. राठोड, ओम सोनोने, विश्वास सरदार, गजानन काळे, जीवन देशमुख, सुधाकर गायकवाड, शालीग्राम गेंड, रमेश वानखेडे, सागर पायघन, भिकाजी गायकवाड, मनोज देशमुख यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.