– गो-हत्यार्यांचा कसून शोध सुरु
गडचिरोली (सेवा पवार) – एकीकडे संपूर्ण भारत देश बैलपोळा सण उत्साहात साजरा करत असताना, दुसरीकडे त्याच पवित्रदिनी गाय-बैलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आलापल्ली येथे उघडकीस आली. टायगर ग्रूप, आलापल्ली घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी पळून गेले असले तरी, त्यांच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत, तसेच या आरोपींचा कसून शोध सुरु आहे.
दिनांक २७ ऑगस्टच्या मध्यरात्री दोन वाजता टायगर ग्रूपला माहिती मिळाली की आलापल्लीपासून पाच किलोमीटरवर जंगलात काही अज्ञात लोक गायींची कत्तल करत आहेत. ही माहिती कळताच टायगर ग्रूपच्या सर्व सदस्यांना याविषयी सांगण्यात आले व सर्वांना सोबत घेऊन तात्काळ त्या घटनास्थळी जंगलाचे दिशने जायला निघाले. काही अंतरावर गेल्यावर त्या जंगल परिसरात बॅटरीचा प्रकाश दिसायला लागला, सर्व सदस्य सतर्क झाले, व सगळे त्या प्रकाशाचा दिशने हळूहळू चालायला लागले. मात्र त्या गाय मातेची हत्या करणार्या आरोपींना कुणी तरी आल्याची चाहूल लागली व ते घटनास्थळाहून पळून गेले. मात्र त्या ठिकाणी दोन दुचाकी व गायीचे मास सापडले आहे. या दुचाक्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. टायगर ग्रूपच्या सदस्यांनी घटनेची माहिती अहेरी पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पळून गेलेल्या आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.