-आळंदी महाद्वार येथे राष्ट्रवादी, काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ एकत्र
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आज सकाळी आळंदी म्हातोबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर तथाकथित संग्राम भंडारे याने शाईफेक केल्याच्या घटनेचा आळंदी शहरात तीव्र निषेध करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ आळंदी देवाची येथे आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ, वारकरी व भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आळंदी महाद्वार येथे जमून संबंधित घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास कुऱ्हाडे पाटील, आळंदी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संदीप नाईकरे, संजय वडगावकर, काळुराम येळवंडे, योगीराज सातपुते, विश्वंभर शिंदे तसेच अखिल भाजी मंडई मंडळ व पितळी गणपती देवस्थानचे अध्यक्ष सुदीप गरुड यांच्यासह अनेक आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अशा प्रकारच्या निषेधार्ह कृत्यांचा तीव्र शब्दांत विरोध करत सामाजिक आणि राजकीय वातावरण बिघडविणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.