-रेश्मा सुजित महाजन ९४.८३ टक्क्यांसह प्रथम, अक्सा अकबर शेख ९१.६७ टक्क्यांसह द्वितीय
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील एस.ई.एस. ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही विज्ञान, कला, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या चारही शाखांचा बारावीचा निकाल १०० टक्के लावला आहे. तर स्व. भास्करराव शिंगणे कला, नारायण गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल ९८.५० टक्के लागला आहे.
दोन्ही महाविद्यालयांतून रेश्मा सुजित महाजन हिने ९४.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर अक्सा अकबर शेख हिने ९१.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. गौरी शशिकांत काटे आणि दिशा साहेबराव सवडदकर यांनी प्रत्येकी ९०.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. एस.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ३०९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत अक्सा अकबर शेख (९१.६७), गौरी शशिकांत काटे (९०.६७) आणि राजू रामसिंग राजपूत (८९.८३) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले. कला शाखेत समीक्षा राजेंद्र खिल्लारे (७९.६७), रोहन परमेश्वर खिल्लारे (७८.५०) आणि कोमल शत्रुघ्न खिल्लारे (७७.८४) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेत प्रेम विलास अंभोरे (८५.५०), अथर्व योगेश कुळसुंदर (८२.००) आणि मोहिनी मुकुंदा गुरव (८१.५०) यांनी यश संपादन केले. एमसीव्हीसी शाखेत ज्ञानेश्वर आनंदा जाधव (७१.६७), पल्लवी संतोष लहाने (७२.१७) आणि सागर सिताराम कव्हळे (६९.६७) यांनी उत्तीर्ण होत यश मिळवले.
स्व. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयातील १७५ पैकी १७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत रेश्मा सुजित महाजन (९४.८३), दिशा साहेबराव सवडदकर (९०.६७) आणि प्रतिक मदन पाझडे (८८.८३) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. कला शाखेत प्राची रामेश्वर गिऱ्हे (७६.८३) आणि कीर्ती खंडू अवचार (७६.००) यांनी यश मिळवले. या उल्लेखनीय निकालामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.