व्हाईस ऑफ मीडियाच्या लोणार तालुकाध्यक्षपदी पत्रकार उमेश कुटे यांची नियूक्ती ..
लोणार-(ब्रेकिंग महाराष्ट्र):- तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून देशातील १७ राज्यांमध्ये कार्यरत असलेली संघटना म्हणून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेची ओळख आहे.संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शणाखाली विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्हा कार्यकारिनीला दिलेल्या निर्देशानूसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे,कार्यध्यक्ष अरुण जैन,सिद्धेश्वर पवार यांनी बुलढाणा जिल्हातील तालुक्याचे तालूका अध्यक्ष जाहीर केले .त्यामध्ये व्हाईस आँफ मीडीयाचे लोणार तालूका अध्यक्ष म्हणून पत्रकार उमेश कुटे यांची नियूक्ती पञ देऊन नियूक्ती केली आहे.सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्रातही पत्रकार आणि पत्रकारीतेच्या सर्वांगिण विकासासाठी ही संघटना अग्रेसर असून या संघटनेच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची निवड नुकतीच जाहीर झाली आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे.
व्हाईस ऑफ मीडीया या पत्रकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ,विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के व जिल्हा कार्यकारिनीने माझ्यावर विश्वास दाखवून माझी तालूका अध्यक्षपदी नियूक्ती केली भविष्यात पत्रकारांना विश्वासात घेऊन त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देऊ. व नवीन तालूका कार्यकारणी लवकरच घोषीत करु.
उमेश कुटे तालूका अध्यक्ष
व्हाईस ऑफ मिडीया लोणार