सोनाळा (ब्रेकिंग महाराष्ट्र) : संग्रामपूर शहरासाठी नगर पंचायत आहे. या नगर पंचायतवर प्रहार संग्रामपूर मित्र पारिवार यांनी एकहाती सत्ता हाती घेतली आहे. तत्कालीन कारभार हा कर्मचारी यांच्या हाती होता. १७ मुनिम १८ चौधरी असा कारभार सुरु होता. मात्र आता सत्ताधारी नगरसेवकांनी दक्ष राहून कारभार सुरु केला आहे . येथे शहराबाहेर ३कुलूपबंद शाळाखोल्याबाबत भंडाफोड उघड केला आहे. २४ ऑगस्ट रोजी हे राज उघड झाले आहे. त्या खोल्यांमध्ये न.प चे लोकोपयोगी मौल्यवान साहित्य भंगारात धूळ खात पडून आहे .
नगर पंचायतचे रेकॉर्ड काही वर्षाआधी जळून खाक झाले आहे . परिणामी कुठली नोंद स्टॉक रजीष्टर घेण्यात आली नसल्याने प्रस्तापित कर्मचारी नगर सेवकांना गोलमाल फिरवत आहेत .मात्र आता जनतेचे प्रहरी असल्याने अनेक कारनामे संग्रामपूर न.प मध्ये उघड होत आहेत .तर न.प. कार्यालयीन अधिक्षक हे डोळे असून आंधळा कारभार करित आहेत.सत्तारुढ गटाच्या सदस्यांनी संग्रामपूर शहराबाहेर चे ले – आऊट मधील जि.प सर्व शिक्षा अभियानाच्या शाळेच्या ३ कुलूपबंद खोल्याची नप कर्मचारी समवेत पाहणी केली . या खोल्यामध्ये पाणी पुरवठा साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले . हापशी व लोखंडी पाईपने खचाखच भरलेल्या आढळून आले .सन २०१६ मध्ये महाराष्ट्र स्पर्धा परिक्षासाठी नप लायब्ररी साठी आलेली पुस्तके अस्ताव्यत रद्दीत फेकण्यात आली . शहरात लावण्यासाठी आलेले युरिनर, नप वापरासाठी आलेल्या नविन खूर्च्या भंगारात टाकण्यात आल्याचे दिसून आले . टेबल त्याचे टॉप, पाणी फिल्टर, घरकुल लाभार्थीना वाटप न केलेल्या शेगडी, पाणबुडी मशिन, अँगल, हापशी फुटबाॅल, ब्लीचींग पावडर कट्टे, सह खूप साहित्य पडून आहे तर लगतच्या खोलीत जि.प जून्या शाळेचे मोल्यवान जूने सावगावान पडून आहे . नगरसेवकांनी हा भंडाफोड करताच शहरात एकच खळबळ माजली आहे व जबाबदारी झटकून तथाकथीत झारीतील शुक्राचार्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे . स्ट्रीट लाईट कव्हर सुद्धा येथे भंगार झाले आहे .न .प पाणी पुरवठा अभियंता यांचे आदेशाने नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी हे कुलूप तोडले .याबाबत नप अभियंता नाफडे यांनी पाणी पुरवठा कर्मचारी विठ्ठल वानखडे यास न .प साहित्याचा स्टॉक नोंदी घेण्याचे आदेश दिले आहेत . सत्तारुढ नगर सेवकामूळे हा घोळ चव्हाट्यावर आला आहे . म्हणून येथे कुंपनाने शेत खाण्यापासून वाचले असल्याचा सूर उमटत आहे.