-वर्षानुवर्षांची परंपरा आजही कायम; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : श्रीरामनवमी निमित्ताने देऊळगाव घुबे येथे वर्षानुवर्ष चालत आलेली सोंग महोत्सवाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक प्रसिद्ध काळुंका मातेच्या जागृत देवस्थानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या सणासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला आणि तरुण मंडळी आपापल्या परीने सहकार्य करून सक्रिय सहभाग नोंदवतात. या उत्सवात विविध देवी-देवतांची वेशभूषा करून रात्रभर धार्मिक कार्यक्रम आणि सोंग सादरीकरण केले जाते. संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान गावातील महिलांनी आपल्या अंगणात सडा-रांगोळी काढून देवीच्या सोंगाची भक्तीभावाने पूजा केली. देवीचे सोंग पवन शालीकराम डुकरे यांनी सादर केले.
श्रीरामनवमी सोंग महोत्सवाचे मानकरी
गवळण – राजेंद्र विजय घुबे, परमेश्वर श्रीराम मिसाळ
गवळ्या – शिवाजी सुरेश घुबे
लिंबाळ्या – गजानन सांडू काकडे
सरस्वती – संदिप दिनकर घुबे
सूत्रधार – एकनाथ रामराव घुबे
गणपती – सोनाजी सुधाकर घुबे
मच्छी – सुधीर राजेंद्र घुबे
कच्छी – परमेश्वर श्रीराम मिसाळ
कलंकी – सुभाष हरिभाऊ घुबे
लायसिंग – सुरेश ज्ञानुबा घुबे
नारदमुनी – खंडू नारायण इंगळे
तंट्याभील – पंजाब दिनकर घुबे
परशुराम – शंकर माणिकराव घुबे
वराह – संतोष भगवान घुबे
लव, अंकुश – आदित्य संतोष घुबे, विनायक गणेश घुबे
महादेव, पार्वती – राजेंद्र रामचंद्र घुबे, ज्ञानेश्वर रामदास घुबे
भाण्यासुर – सदानंद देविदास चवरे
राम, लक्ष्मण – राहुल विलास घुबे, सागर नारायण घुबे
सीता – शंकर परमेश्वर चवरे
हनुमान – विलास एकनाथ घुबे
डाकीण – सुगदेव लक्ष्मण घुबे
आग्या सूर – भागवत वासुदेव चेके
रावण – गणेश रामकृष्ण घुबे
इंद्रजीत – दामोधर ज्ञानुबा घुबे
अंगद – समाधान सोनोने | मारीछ – संतोष शेषराव घुबे
चित्रसेनापती – विकास अनंता घुबे
बिभीषण – भाऊराव रामराव घुबे
सेनापती – भानदास सरादे
जंबुमाळी – भगवान मामा शिंदे
सैनिक १ – रामदास चवरे, संतोष शंकर, सुरेश विश्वनाथ
सैनिक २ – गणेश प्रकाश घुबे, सुरेश शंकर घुबे, सुभाष टेटवार, परसराम जयवंता घुबे
मारीष मामा – संतोष शेषराव घुबे
हा सोंग महोत्सव भक्ती, परंपरा आणि गावकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक ठरला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.