-तालुकाध्यक्षपदी सुभाष गवई; कार्याध्यक्ष सचिन डोंगरदिवे यांची निवड
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : काष्ट्राईब शिक्षक संघटनेची सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी सुभाष गवई यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन डोंगरदिवे यांची निवड करण्यात आली आहे.
दि. २२ मार्च रोजी दुसरबीड येथे जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष दिलीप दादा खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप वानखडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय जाधव, सुभाष पडघान आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी व सदस्यांची मते जाणून घेत जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे यांनी नियुक्त्या जाहीर केल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विभागीय केंद्र समन्वयक परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अजय आढाव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल साळवे यांनी केले. या सभेला सिंदखेडराजा तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.