-संसद परिसरातील घटनेचा निषेध; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
लोणार (वाजिद खान) : संसद परिसरात काँग्रेस व विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या निषेधार्ह प्रकाराच्या विरोधात आज लोणार येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्या नेतृत्वात हिरडव चौक येथे आयोजित या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय संसद भवनाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला.
या आंदोलनात प्रकाश गवळी (जिल्हा महामंत्री, भाजपा बुलढाणा), शुभम बनमेरू (शहराध्यक्ष, लोणार), शुभम देसाई (जिल्हा सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा बुलढाणा), विजय मापारी (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा), मारुती सुरोशे (किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष), ॲड. शिवाजी सानप (जिल्हा सचिव, भाजपा), प्रमोद वराडे (तालुका सरचिटणीस), संतोषराव देशमुख (किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. ज्ञानेश्वर गरकळ, राजेंद्र डोळे (तालुका सरचिटणीस), विष्णू डोळे (जिल्हा सचिव), गणेश तांगडे (सोशल मीडिया जिल्हा सरचिटणीस), विनोद थोरवे (युवा नेते), विजय दराडे (युवा जिल्हा उपाध्यक्ष), अजीम चौधरी (शहर सचिव), संदीप मापारी, शुभम भगत (नगरसेवक, भाजपा), दत्ता नेवरी, पंकज राऊत, प्रशांत मादनकर, पवन खडककर, अजय मादनगर, कैलास जावळे, धनराज मादनकर, संदीप आमले आदींसह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.