-रेणुका बीज भंडार, चिखली येथे शंतनू बोंद्रे यांच्या पुढाकाराने सामाजिक प्रश्नांवर मंथन
देऊळगाव घुबे ता. चिखली (राजेंद्र घुबे) : सामाजिक विकासाची परंपरा जपणाऱ्या चिखली नगरीत धुलिवंदनाच्या निमित्ताने ‘वैचारिक होळी’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेणुका बीज भंडार येथे शंतनू बोंद्रे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा करत जनजागृतीचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शंतनू बोंद्रे यांनी सांगितले की, समाजात आणि गावात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी मुंबई किंवा दिल्लीहून कोणी येण्याची गरज नाही. त्या चुका आपणच सुधारू शकतो. त्यामुळे प्रत्येक चिखलीकराने ‘आम्ही सुधारू आमचे गाव’ हा संकल्प मनाशी बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.या वैचारिक होळी कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाऐवजी प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते बीडी, सिगारेट आणि गुटखा यांची होळी करून करण्यात आली. समाजातील व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती व्हावी, हा त्यामागील उद्देश होता.
कार्यक्रमात जलसंधारण, पर्यावरण, बिघडत चाललेली युवा पिढी, राजकारणाची खालावलेली पातळी तसेच युवकांच्या विवाह समस्यांसारख्या विविध विषयांवर चर्चा झाली. बुलढाणा येथून आलेल्या शाहीना पठाण यांनी महिलांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले, तर सोनाली दळवी यांनी युवकांच्या बदलत्या प्रवृत्तींबाबत विचार मांडले. सौ. शितल सोनुने यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगताना मानवी शरीरात नकळत जाणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण स्पष्ट केले. श्रीमती लांजेवार यांनी अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रकाश टाकला. स्वर्गीय भारतभाऊ यांच्या पत्नी लक्ष्मीताई बोंद्रे यांनी यशस्वी पुरुषांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या स्त्रियांच्या त्यागाचे महत्त्व सांगितले. चिखलीच्या कन्या प्रतिभा भुतेकर यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केले, तर स्वाती सावजी यांनी स्त्री अत्याचार आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन या विषयांवर विचार मांडले.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.आर. पाटील, ॲड. ए.टी. देशमुख, पत्रकार कैलास गाडेकर, दासा पाटील, हरिभाऊ येवले, विशंभर शेळके, रामदास मोरे, आनंद लहाने, चक्रधर लांडे, वसंतराव गाडेकर, पीएसआय नागरे, डॉ. नितीन पाटील, सचिन बोंद्रे, किशोर हेलगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शेतीला जोडधंदे, व्यावसायिक शेती, जैविक तंत्रज्ञानाचा वापर, पालकांची जबाबदारी, सोशल मीडियाचा गैरवापर, स्त्री भ्रूणहत्या, तसेच लग्न समारंभातील वाढते खर्च आणि अन्नाची नासाडी या विषयांवरही विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शंतनू बोंद्रे यांनी समाजातील चुकीच्या गोष्टी वेळेतच थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘आम्ही सुधारू आमचं गाव’ या नव्या संकल्पनेची सुरुवात करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. गीता बोंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमाला मनोज दांडगे, पत्रकार समाधान गाडेकर, उद्धव थुट्टे, रेणुकादास मुळे, भिकू लोळगे, विनोद खरे, राजेंद्र घुबे, भिकनराव भुतेकर, शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन मोरे, विलास भालेकर, विजय अंभोरे, दीपक म्हस्के, प्राचार्य हरिदास घुबे, आर.डी. सुरडकर, वसीम खान, प्रशांत झीने, दत्ता रुपसिंग परिहार, शेख रसूल, शेख आजम, भगवानराव काळे, अँड. पवार, अँड. सदार, प्रवीण घड्याळे, दामूअण्णा शिंदे, विलास वसू, नंदू परिहार, अरुण इंगळे, सतीश भुतेकर, मुख्याध्यापक लक्ष्मण भगत, विनायक सरनाईक, संदीप पाटील, गणेश हाडे, सुनील सुरडकर, अनंथा गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, रामेश्वर इंगळे, संजय वानखडे, विष्णुपंत इंगळे, गणेश मोरे, प्रा. उद्धव घुबे, संजय वाघमारे, समाधान झगरे, संतोष तोंडे, रवी डाळीमकर, वाकोडे, प्रकाश वाघ, सालोक सर, संतोष इंगळे, शेलूद, बोधेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.