-१ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान उपक्रम; बिबी शाखेत उत्स्फूर्त प्रतिसाद
बिबी (प्रतिनिधी) – राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा ‘वन बुलढाणा मिशन’चे संकल्पक मा. संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त १ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान १०० रक्तदान शिबिरांचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडत असून समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि. २७ फेब्रुवारी रोजी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणाच्या बिबी शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांना वंदन करून केली. यावेळी प्रल्हाद ढाकणे, गैबिनाथ ढाकणे, डॉ. गायकी सर, गणेश गाडे, गोविंद राठोड, गुलाब नागरे, भाऊसाहेब आटोळे, रामेश्वर काळूसे, वितेश चव्हाण, जयजीत आडे, प्रभाकर डहाळके, केंद्र सर, सुरेश लोढा, ज्ञानेश्वर कुहीटे, संजय अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र तसेच गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बिबी येथील स्थानिक संचालक मंडळातील सर्व सदस्य, प्रतिष्ठित खातेदार, शाखा व्यवस्थापक तसेच कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.