-महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर अव्वल शिष्यवृत्ती साध्य
आळंदी (अर्जुन मेदनकर) : संगीत सम्राट पं. यादवराज फड यांची द्वितीय कन्या, अँड. चंद्रिका फड, महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर कठोर परिश्रम व समर्पणाच्या जोरावर शासकीय शिष्यवृत्ती मिळवून ऑस्ट्रेलियातील सिडनी युनिव्हर्सिटीत एल.एल.एम.साठी रवाना झाली.
गेल्या दोन वर्षांत चंद्रिकाने पुणे, शिवाजीनगर कोर्टात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने मोठ्या सिनीयर वकील आणि न्यायाधीशांसमोर इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व दाखवून, विद्वत्तेचा ठसा उमटवला आहे. तिच्या लाघवी स्वभाव, छाप पाडणाऱ्या व्यक्तिमत्त्व आणि कठोर परिश्रमामुळे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना ती आकर्षित करण्यात यशस्वी झाली.
शैक्षणिक क्षेत्रात पार्श्वभूमी नसतानाही कठोर मेहनत, जिद्द आणि महीन्याभराचा अथक संघर्ष यामुळेच ती शिष्यवृत्ती मिळवून एल.एल.एम.साठी जगभरातील स्पर्धेत यशस्वी ठरली आहे. बॅडमिंटन स्पर्धांत अनेक पारितोषिके जिंकून तिने आपल्या बहुगुणी कौशल्याची छापही उमटवली आहे. संगीत सम्राट पं. यादवराज फड आणि आई-वडील यांनी तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत, तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. महाशिवरात्रीच्या महापर्वकाळी तिचे प्रस्थान हे तिच्यावर असलेल्या दैवी कृपेचे प्रतीक मानले जाते आणि विश्वास व्यक्त केला जातो की चंद्रिका आपल्या क्षेत्रात निश्चितच शिखर गाठेल.