-आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय सराव शिबिरात निवड
पुणे (अर्जुन मेदनकर) : आर्मी रोइंग नोड येथे नुकत्याच पार पडलेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीची खेळाडू भाग्यश्री घुले हिने उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले.
या यशाच्या जोरावर भाग्यश्रीची आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे आयोजित राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हे शिबिर महत्त्वाचे मानले जात आहे. भाग्यश्री घुले ही एमआयटी एडीटी शिक्षण संकुलातील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तिला विद्यापीठातील राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशामुळे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत मानाची भर पडली आहे.
या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, माईर्स शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. स्वाती चाटे-कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड, माईर्स एमआयटी गुरुकुलच्या प्रकल्प संचालक डॉ. ज्योती जोटवानी तसेच एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रिपल शर्मा यांनी भाग्यश्रीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या कामगिरीमुळे विद्यापीठासह राज्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.