-कबड्डी व धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन
साकेगाव (महेंद्र हिवाळे) : सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी श्री शिवाजी हायस्कूल, साकेगाव येथे केंद्रस्थरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा जि. प. शाळा केंद्र सावरगाव डुकरे अंतर्गत पार पडल्या. या केंद्रीय क्रीडा स्पर्धेत जि. प. साकेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उत्कृष्ट यश संपादन केले.
स्पर्धेत वर्ग १ ते ५ मधील मुलींच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकावले. तसेच वर्ग १ ते ५ आणि ६ ते ८ मधील मुलांच्या कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळवले. धावण्याच्या स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. १०० मीटर धावणे स्पर्धेत अनुष्का वि. इंगळे हिने प्रथम, तर लुंबिनी आ. निकाळजे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. मुलांमध्ये १०० मीटर धावणे स्पर्धेत नावेद सईद खान याने प्रथम क्रमांक पटकावला. २०० मीटर धावणे स्पर्धेत रोशन सु. लोखंडे याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर मुलींच्या २०० मीटर धावणे स्पर्धेत जोया आलम खान हिने द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.