– रक्तबंबाळ अवस्थेतील समाधान भुतेकर यांना चिखलीच्या जवंजाळ हॉस्पिटलमध्ये हलविले, प्रकृती गंभीर!
– पत्नी, बहीण, आईसमोर खिशातून चाकू काढून गळा चिरला; इसरूळसह परिसरात खळबळ!
चिखली (रंजना मोरे) – तालुक्यातील इसरूळ येथील शेख अकबर शेख कमाल या आरोपीने घरात घुसून समाधान भुतेकर यांच्यावर चाकूहल्ला करून गळा चिरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ झालेल्या भुतेकर यांना तातडीने चिखली येथील श्रीकृपा जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदूच्या घरात घुसून आई, पत्नी, बहिणीसमोर चाकूहल्ला झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
सविस्तर असे, की इसरूळ येथील शेख अकबर शेख कमाल हा काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समाधान भुतेकर पाटील यांच्या घरात घुसला, व माझ्या घरी चला म्हणून त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न करू लागला. काय झाले, असे विचारून समाधान भुतेकर हे बाहेर जाण्यास तयार झाले नाही, तेव्हा या शेख अकबर शेख कमालने खिशातून धारदार चाकू काढून समाधान भुतेकर यांच्यावर हल्ला केला. चाकूने गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याने भुतेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. घरी त्यांच्या पत्नी गंगुबाई समाधान भुतेकर (वय २९) या फिर्यादी यांच्यासह बहीण शालिनी भावले, आई मधुराबाई भुतेकर या होत्या. या सर्वांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ जमा झाल्याचे पाहून आरोपी हा चाकूसह पळून गेला. ग्रामस्थांनी तातडीने समाधान भुतेकर यांना चिखली येथील श्रीकृपा जवंजाळ हॉस्पिटल येथे हलवले. सद्या भुतेकर यांची तब्यात गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत गंगूबाई भुतेकर यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय सुरेश जारवाल हे करत आहेत.
या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. इसरूळमध्ये यापूर्वीही काही वर्षांपूर्वी असाच एका महिलेचा खुन झाल्याची आठवण लोकांनी व्यक्त केली. त्या वेळीही गाव हादरून गेले होते. सदर घटनेची घटनेची माहिती स्वतः आरोपी शे. अकबर शे. कमाल याने गावचे सरपंच सतीश पाटील भुतेकर व पोलीस पाटील जयपाल वायाळ यांना माहिती दिली की, समाधान भुतेकर याचा मी गळा कापला आहे, आता मी पोलीस स्टेशन ला जातो म्हणून स्वतःहून अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता.