AalandiPachhim Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांची बीजतुला उत्साहात!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आरंभ फाउंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळ्याची बीजतुला करून सह्याद्री देवराईचे प्रमुख मार्गदर्शक अभिनेते सयाजी शिंदे यांचेकडे देशी झाडांच्या ३३ प्रजातीच्या हजारो बिया सुपूर्त करण्यात आल्या.
आरंभ फाउंडेशन च्या वतीने पंचक्रोशीतील शाळांच्या सहकार्याने शालेय मुलांच्या माध्यमातून बीज संकलन मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्रातून अनेक निसर्गप्रेमी, शाळेतील विद्यार्थी यांनी चांगल्या प्रतिसाद देऊन अनेक देशी झाडांच्या बिया दिल्या. ३३ प्रजातीच्या असंख्य बिया अभिनेते सयाजी शिंदे यांचे कडे रोपे तयार करण्यास सुपूर्द करण्यात आल्या.  यावेळी जमा करण्यात आलेल्या देशी वृक्षांच्या बियांची श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुर्नाआकृती पुतळ्याची विधिवत पूजा करून बीज तुला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते सह्याद्री देवराई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सयाजी शिंदे, ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा, यशवंत लिमये विविध पर्यावरण प्रेमी सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार आरंभ फाउंडेशन सचिव विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरंभ फाउंडेशन अध्यक्षा वैष्णवी पाटील म्हणाल्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या कार्याची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने अनेकांना निसर्ग संवर्धन कार्याला जोडण्यासाठी ही मोहीम हाती घेतली. अनेक शाळांनी बीज संकलन मोहिमेत भाग घेऊन बीज संकलन केले. बीज संकलन मोहिमेत निसर्ग प्रेमीं संस्था, व्यक्ती यांना आवाहन करण्यात आले होते. यात अनेकांनी सहभाग घेत आपापल्या भागातून देशी झाडांच्या बिया संकलित करून त्या आरंभ फांऊंडेशन कडे दिल्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारत असताना महाराजांचे निसर्ग संवर्धनाचे विचार त्यांच्या आज्ञापत्रातून व्यक्त होत आहेत. हाच विचार सर्वांपर्यंत पोचला पाहिजे असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी अभिनेते अभिनेते सयाजी शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना या कार्यात घेण्यासाठी निसर्ग संवर्धनाच्या संस्काराचे बीज रुजले पाहिजे. ते म्हणाले झाडापेक्षा कोणीच मोठा नाही. तोच सर्वस्व आहे. युवक तरुणांनी वाम मार्गाला न जात पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे. बॉब हातात न घेता बिया, वृक्ष हातात घेऊन पर्यावरणाचे कार्य पुढे नेण्यास सहभागी व्हावे असे सांगितले.

विविध शाळांनी संकलित केलेल्या बियांचे प्रदर्शन पाहत अभिनेते यांनी शालेय मुलांकडून स्वागत फुले स्वीकारत शाळांच्या कार्याचे कौतुक करीत उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी बियांची राखी बांधून पर्यावरण जनजागृती रक्षाबंधन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची बहुदा पहिलीच बीज तुला उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी निसर्ग प्रेमी देहू रानजाई प्रकल्प प्रमुख सोमनाथआबा मुसूडगे, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, जगजीवन राम कातखेडे, अनिल निंबोलकर, सुरेश देसाई, सुभाष पाटील, तानाजी भोसले, निलेश साळुंखे, डॉ. सायली कुलकर्णी, शांताराम बोबडे, अमोल गाडेकर, उल्हास पठाडे, सुहास कडू, रुक्मिणी मुळे, दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारीत विद्यालय चिखली, ब्लॉसन पब्लिक स्कूल ताथवडे, कृष्णराव भेगडे स्कूल तळेगाव दाभाडे, जिल्हा परिषद शाळा देगाव अकोला या पर्यावरण प्रेमी व्यक्ती संस्थाना निसर्गसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पर्यावरण पूरक उपक्रम राबवणाऱ्या दादा महाराज नाटेकर विद्यालयचा प्रांगणात विष्णू लांबा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास निसर्गप्रेमी विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!