– अकोल्यातील हॉटेल व्हीसीए इम्पेरियलच्या सभागृहात संपन्न झाला गौरव सोहळा
बुलढाणा (राजेश लोखंडे) – राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांना लोकमत विमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. अकोला येथील हॉटेल व्हीसीए इम्पेरियलच्या सभागृहात २९ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पश्चिम वऱ्हाडातील नारीशक्तीचा गुरुवारी लोकमततर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी विठ्ठल ग्रुप प्रायोजित लोकमत विमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड बुकचे प्रकाशन झाले. याप्रसंगी वाशीमच्या आमदार भावनाताई गवळी, चिखलीच्या आ. श्वेताताई महाले, अकोल्याचे आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह मुख्य प्रायोजक कालूराम फूड्सचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ रुहाटीया यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून अभिनेत्री किशोरी शहाणे यांची उपस्थिती होती. सहकार, समाजकारण, महिला सक्षमीकरण, शिक्षण क्षेत्रात आपण केलेल्या कार्याचा गौरव झाल्याचे मनाला समाधान आहे. या पुरस्कारामुळे अधिक जबाबदारी वाढली असून जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याच्या भावना मालतीताई शेळके यांनी व्यक्त केल्या.