देशाचा अमृत महोत्सव “घरोघरी तिरंगा” फडकावून अविस्मरणीय व ऐतिहासीक म्हणून सोहळा साजरा करा- – आ.ॲड.आकाश फुंडकर
बुलडाणा:(ब्रेकिंग महाराष्ट्र):- देशाचा अमृत महोत्सवी सोहळयात सहभागी होण्याचे सौभाग्य आपल्याला मिळाले असून भारतीय स्वतंत्रता ला 75 वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महान क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्राम सेनानीं यांनी दिलेल्या बलिदानाचे दैदीप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी 13 ऑगस्ट 2022 ते 15ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये “घरोघरी तिरंगा” लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हे अभिमान घरोघरी पोहचविण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ.ॲड आकाश फुंडकर यांनी मेहकर व लोणार या तालुक्यामध्ये “घरोघरी तिरंगा” अभियानामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी देशभक्त नागरिकांनी घरोघरी दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करावे असे आवाहन केले. “घरो घरोघरी तिरंगा” हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीचा कुटुंबाचा व समाजातील सर्व स्तरातील लोकांचा देशाभिमान जागृत करणारा व स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म पत्करलेल्या स्वातंत्रविरापासून प्रेरणा घेणारा आहे. हा महोत्सव लोक चळवळ व्हावा व जनसामान्य माणसात राष्ट्र प्रेमाची भावना जागृत व्हावी यासाठी आपणही आपले घरावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकावून हा अमृत महोत्सव विस्मरणीय व ऐतिहासिक सोहळा साजरा करावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी या अभियानाच्या प्रचार दौऱ्यात केला त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून “घरोघरी तिरंगा” हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्याचे ठरले आहे. हे अभियान बुलढाणा जिल्हयात सुध्दा अविस्मरणीय व ऐतिहासिक सोहळा म्हणून साजरा व्हावा, असे आवाहन लोणार येथे बोलतांना आ.ॲड आकाश फुंडकर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी केले. ज्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या त्यागामुळे व तिरंगा झेंडयामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी या अभियानात सहभागी होता आले हे आपल्या सर्वांचेच सौभाग्य आहे १५ ऑगस्टला देशभक्तीपर गीते, रांगोळी व अन्य कार्यक्रमांचे पक्षातर्फे आयोजन करावे. चौकाचौकात वेगवेगळया वेशभूषांचे ज्यामध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा व शहिदांचा समावेश असेल त्यांची वेशभूषा देखावा साकारावा. मैं और मेरा तिरंगा या ॲपवर स्वतः तिरंग्या सोबत सेल्फी काढावी व टाकावी. असेही आवाहन यावेळी त्यांनी केले, या दौऱ्यात जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा, नंदकिशोर अग्रवाल, डॉ. गणेश मांटे व प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ या दौऱ्यास सहभागी होते. तसेच मेहकर व लोणर येथे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.